Wednesday, June 20, 2018

व्यवसाय

MLM scheme चे सत्य

मित्रांनो,आजकाल सगळेच ग्रुप MLM schemes ने भरभरून वाहतात. पण हे खरंच legal आहे का याचा आपण विचार केला पाहिजे,

Central Government ने 1978 साली Prize Chits and Money Circulation Schemes ( Banning) Act अमलात आणला होता. हा कायदा अस म्हणतो की कुठली ही कंपनी प्रॉडक्ट किव्वा सर्विसेस न देता जर फक्त पैसे फिरवायचे काम करत असेल तर ती legal नाही.

पैसे फिरवणे म्हणजे काय ?
Join करतांना तुमच्याकडून 10 रुपये घ्यायचे आणि तुमच्या खाली अजून लोक लावायचे त्यांच्याकडून प्रत्येकी 10 -10 रुपये घेऊन वरच्या level ला distribute करायचे .

अशा प्रकारामध्ये value delivered to customer शून्य असते.

आता ज्या MLM कंपनी मार्केट मध्ये आहेत त्यांनी याच business ला legal करण्यासाठी products आणले. तुमच्याकडून 10000 रुपये घेणार, 2000 रुपये ची किंमत नसलेले प्रॉडक्ट (फक्त नावासाठी) तुम्हाला देणार आणि म्हणतील काय की तुम्ही distributor झाले.

बर distributor झाले तर हे प्रॉडक्ट end user ला विका, पण हे म्हणतात नाही, पैसा कमवायचा असेल तर अजून लोक जोडा, नेटवर्क बनवा.

शेवटी ह्या त्याच पैसे फिरवणाऱ्या company आहेत , फक्त कायद्यात बसण्यासाठी त्यांनी प्रॉडक्ट विकणे सुरू केले.

Concept based project, no marketing, no investment, no selling अशा अनेक भूलथापा देऊन join करवून घेणारे आपलेच मित्र स्वतःच त्यात अडकलेले असतात.

500 पासून 5 लाख पर्यंत इन्व्हेस्टमेंट असलेल्या अनेक direct selling कंपन्या आहेत. त्यांचे अनेक नवीन नवीन प्रकार आहेत, सगळ्यांचे सेमिनार असतात, training असतात. शेवटी करायला एकच लावतील, ते म्हणजे "लोक जोडणे".

Direct selling फक्त नाव आहे, selling इथे होतच नाही, होते फक्त networking. (मार्केट मध्ये पैसे फिरवणे)

काही प्रश्न आहेत माझे त्यांची उत्तरे असतील तर द्या मला, कदाचित मी चुकलो असेल

जर तुमच्या प्रॉडक्ट मध्ये quality आहे तर सरळ प्रॉडक्ट सेल करा ना, नेटवर्क कशाला बनवायचे??

Direct selling जर future आहे तर p&g, dabar, godrej, Britannia अशा मोठ्या कंपन्यांनी त्यात उडी का बरं घेतली नाही अजून??

कंपनी च नाव आणि direct selling अस सरळ पोस्ट मध्ये का टाकत नाही? कॉल करून सांगतो किव्वा Seminar ला का बोलावता?

यानंतर कोणी तुमच्याकडे येऊन म्हटले की 3 महिन्या मध्ये passive income सुरू होईल, त्याला 3 महिन्यानंतर भेटा आणि त्याची income बघून मग जॉईन करा.

Business करायचा तर काहीतरी real करा, नेटवर्क मध्ये स्वतः अडकून दुसऱ्यांना अडकवण्यात मजा नाही, समोरचा आयुष्यभर तुम्हाला शिव्या देईल.

चहा विका, भाजीपाला विका, कुठेतरी कामाला लागून electronics repaire शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू करा. करायला खूप काही आहे, फक्त सुरुवात शून्यातून करावी लागेल. एका रात्रीत कोणीही श्रीमंत होत नाही.

स्टार युथ इंडिया बुझिनेस ग्रुप एक बचत गट आहे जो तुम्हाला बुझिनेस सुरू करून तर देणारच सोबत मोठा करण्याकरिता मदत पण करेल।।आजच माहिती घेऊन व्यवसाय सुरू करा।
8999932682