Thursday, May 25, 2023

12 वी झाली आता काय ?

12 वी नंतर काय...✍️

🤝 12 वीच्या पदवीच्या नंतर, आपण विविध पर्यायांपैकी निवड करू शकता. खालीलपैकी काही पर्याय आहेत ज्यांचा आपल्याला लक्ष देऊ शकतो:

👋 प्रवेशपत्रिका पदवी: आपण 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर, आपण प्रवेशपत्रिका पदवी (डिप्लोमा) घेऊ शकता. त्यामुळे आपण कंप्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकॅनिकल, सिव्हिल, अपूर्ण उपक्रम, प्राध्यापकत्व, कृषि, आणि इतर विभागांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

👋 पदवी विद्यार्थी: आपण विद्यार्थीसाठी तत्त्वज्ञान, कला, वाणिज्य, संगणकाचे विभाग, आणि इतर पदवी क्षेत्रात प्रवेश घेऊ शकता.

🤝 प्रवेश प्रशिक्षण: प्रवेश प्रशिक्षण कोर्सेस म्हणजे ITI (आयटीआय), व्यावसायिक प्रशिक्षण (वीटीई), अनुदानित प्रशिक्षण अभ्यासक्रम (एनटीएससी), आणि इतर संकल्पांमध्ये प्रवेश घेऊ शकता. हे कोर्सेस कार्यक्षेत्रांमध्ये तयारी करतात आणि तत्त्वज्ञान, कृषी, वाणिज्य, फॅशन डिझाइनिंग, सौंदर्य व निळंबित कला, आणि इतर विषयांमध्ये निवड करतात.

👍 स्नातकार्थी पदवी: जर आपण स्नातकार्थी पदवी प्राप्त करण्याची इच्छा असेल, तर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य, कला, सामाजिक विज्ञान, मानविकी, मानवशास्त्र, सामाजिक कार्य, विचारशिलता, आणि इतर विषयांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

🙌 प्रवेश नवीन पदवी: जर आपल्याला विज्ञानाच्या क्षेत्रात अध्ययन करायला आवडत नसेल, तर आपण नवीन पदव्यांमध्ये प्रवेश घेऊ शकता. इतर पदव्यांमध्ये मसाग्रदर्शी, शिक्षण, आर्थिक विज्ञान, सामाजिक कार्य, संगणक विज्ञान, वाणिज्य, कला, औषध, प्रबंध, आणि अन्य विषयांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

👐 आपल्याला खालील पद्धतींमधून काही उपक्रम शिकण्याची संधी आहे:

विद्यापीठांमध्ये प्रवेश: विभिन्न विद्यापीठांनी स्नातक कोर्सेस प्रदान करतात. तुम्हाला संबंधित विषयात संशोधन करायला आवडते तर तुम्ही योग्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

अंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश: काही विदेशी विद्यापीठे शैक्षणिक कोर्सेस प्रदान करतात. तुम्हाला विदेशातील शैक्षणिक संशोधनात आकर्षित करतात तर तुम्ही योग्य अंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

दूरशिक्षण: काही विश्वविद्यालयांनी दूरशिक्षण प्रदान करतात. तुम्ही घरपर्यंत अभ्यास करू शकता आणि आपल्या निर्दिष्ट संगणक व इंटरनेट वापरून परीक्षा देऊ शकता.

पेशेवर प्रशिक्षण: काही कंपन्यांनी पेशेवर प्रशिक्षण कोर्सेस प्रदान करतात. तुम्ही त्या कंपन्यांमध्ये सामील होऊ शकता आणि कामाला तपशीली प्रशिक्षण प्राप्त करू शकता.

यापैकी कोणत्याही विषयात तुम्हाला आवडल्यास, संबंधित इंस्टिट्यूट्स व महाविद्यालयांना अर्ज करून प्रवेश घेऊ शकता. आपल्या अभ्यासाच्या पथावर पुढे जाण्यासाठी मेहनत, अभ्यास आणि निरंतर वृत्तपत्रे गर्द करणे महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाच्या वृत्तपत्रे प्रविष्ट करण्यासाठी तयारी करावी लागेल.

भूषण धुवे ( स्टार युथ इंडिया )

Saturday, July 31, 2021

भारतीय ग्राहक आणि वितरण यंत्रणा

स्वदेशी आणि ‘पुनश्च हरिओम!’

लोकमान्य टिळकांनी स्वदेशीची हाक दिली त्याला आता शंभरहून अधिक वर्षे होऊन गेली. विशेष गोष्ट म्हणजे शतकानंतरही टिळकांनी सांगितलेला स्वदेशीचा विचार आजही तितकाच प्रासंगिक आहे. ही गोष्ट खरी आहे की टिळकांनी स्वदेशीची हाक दिली तो त्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढाईचा एक टप्पा होता. आजच्या काळातला स्वदेशीचा आग्रह कोणाविरुद्ध नसून भारतीय उद्योजकांच्या आणि उद्यमशीलतेच्या समर्थनासाठी केलेला प्रयत्न आहे. चार महिन्यांपूर्वी, ज्याला सगळेजण ‘पीपीइ किट’ म्हणतात असे वैद्यकीय सुरक्षेसाठीचे कपडे भारतात बनत नव्हते. अवघ्या चार महिन्यातच असे कपडे (पीपीइ कव्हरऑल) बनवणारा जगातील महत्त्वाचा उत्पादक आपला देश ठरला आहे. हा केवळ एक उदाहरणार्थ उल्लेख आहे. भारतीय तंत्रज्ञांनी आणि उद्योजकांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात याचा प्रत्यय यापूर्वीही अनेकदा आला आहे.

स्वदेशी उत्पादकांच्या प्रकारातला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्थानिक स्तरावर चांगले उत्पादन करणारे छोटे उद्योजक. चांगल्या मार्केटिंग साखळीच्या अभावी गुणवत्ता चांगली असूनही अशी उत्पादने केवळ स्थानिक बाजारपेठेतच आपला ठसा उमटवतात असा आजवरचा अनुभव आहे. अशा छोट्या-छोट्या उत्पादकांसाठी मार्केटिंगची व विक्रीची आधुनिक तंत्रज्ञान वापरून एक व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे. अशा कुठल्याही प्रयत्नांना लोक भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री बाळगण्यासारखे आजचे चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या कोविडच्या साथीमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत तर अनेकांना अर्ध रोजगार वा अल्प रोजगार मिळत आहे. स्थानिक ठिकाणच्या उत्पादन प्रक्रिया अधिक मजबूत झाल्या तर महाराष्ट्रा मध्ये स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण होण्याच्या संधीही वाढणार आहेत.

कोविडच्या साथीमुळे झालेला आणखी एक सकारात्मक बदल असा आहे की विदेशी उत्पादनांच्या पेक्षा चांगली देशी उत्पादने स्वीकारण्याकडे समाजाचा कल वाढला आहे. माननीय पंतप्रधानांनीही ‘आत्मनिर्भर भारत’ किंवा ‘Vocal for local’ असे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून ‘पीपीइ किट’ बनवणाऱ्या कंपन्या, औषधे बनवणाऱ्या कंपन्या, आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या, रोग प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपन्या अशा विविध कंपन्या भारतीय उत्पादनांसाठी वेगाने पुढे आल्या आहेत, येत आहेत. एक समाज म्हणून आता आपली जबाबदारी अशी आहे की स्थानिक ठिकाणी निर्मिती होणाऱ्या आणि चांगली गुणवत्ता असणाऱ्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळायला हवा.

कोविडच्या साथीमुळे अन्नपदार्थ, दूध-दुभते, किराणा, भाजीपाला, औषधे अशा रोज लागणाऱ्या गोष्टींची घरपोच सेवा मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारपेठेत जाऊन अनावश्यक गर्दी करण्यापेक्षा आणि जंतुसंसर्ग होण्याची ची शक्यता वाढण्यापेक्षा अशा वस्तू थेट घरी मागवण्याचा पर्याय लोक स्वीकारत आहेत. अशा प्रकारे घरपोच वस्तू पोहोचवण्याच्या मार्केटिंग साखळीमध्ये स्थानिक आणि छोट्या उत्पादकांचा अधिकाधिक सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे. असा कुठलाही प्रयत्न विकासाची फळे अगदी शेवटच्या तालुक्या पर्यंत... शेवटच्या गावापर्यंत पोचवण्यात आपला महत्त्वाचा वाटा उचलणार आहे.

महाराष्ट्रात ‘स्टार युथ इंडिया- भारत कॅन्टीन’ ह्या बचत गट ते व्यवसाय उपक्रमाच्या माध्यमातून वरील विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करत आहोत. कोविडची साथ हे जसे वैद्यकीय संकट आहे तसे ते आर्थिक संकट देखील आहे. स्थानिक उत्पादक आपापल्या छोट्या स्तरावर रोजगार निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्व उत्पादनांना, उत्पादकांना आणि प्रयत्नांना लोकांसमोर आणणे व त्या माध्यमातून चांगली स्थानिक उत्पादने व अशा उत्पादनांना स्वीकारण्याची मनोमन तयारी असणारा महाराष्ट्रभर पसरलेला ग्राहक ह्यांच्यामध्ये एक स्मार्ट-दुवा म्हणून आपण काम करणार आहोत. आपण एक उत्तम ग्राहक गट तयार करून गटातील ग्राहकांना सर्व उपलब्ध वस्तू कमीत कमी पैशात उपलब्ध व्हावा अशी Supply Ststem विकसित करत आहोत. यासाठी आपण सर्वांना एकत्रित येणे आवश्यक आहे.
आज लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीच्या दिवशी आपण स्वीकारलेले हे काम अत्युत्तम आणि उत्तुंग करण्याचा संकल्प करुया. शतकापूर्वी ह्या महाराष्ट्राच्या मातीत ‘स्वदेशी’ ह्या मंत्राचा उच्चार करणाऱ्या लोकमान्य टिळकांना हीच सक्रीय आदरांजली ठरेल.

Wednesday, July 28, 2021

Bharat Canteen

सुप्रभात मित्रांनो,
   आजच्या काळात प्रत्येकांना आपला आपल्या परिवाराला अधिक आर्थिक मिळकतीची आवश्यकता आहे.

शैक्षणिक खर्च उच्च शिक्षणाचा खर्च संभाळण्यासाठी अधिक मिळकतीची विदयार्थी कुटुंबाला आवश्यकता आहे.

गृहकर्ज EMI कमी वेळेत भरण्यासाठी नोकरदार तसेच दुकानदार यांना अधिक मिळकतीची आवश्यकता आहे. नवीन घर घेण्यासाठी अधिक पैसाची आवश्यकता आहे.

आवडीच्या प्रत्येक वस्तू घेण्यासाठी अधिक मिळकतीची आपल्याला आवश्यकता आहे.

किंबहुना दैनदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील अधिक कमाई हवीच.

तर यावर पर्याय म्हणून भारत कॅन्टीन एक उत्तम व्यावसायिक ग्रुप आहे.
999/- मध्ये मिळवा खूप काही
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी व्यावसायिक संधी
Risk Free
नाविन्यपूर्ण गृहपयोगी वस्तूची Agency विना अटी आणि शर्ती नी।
सोबत Intansive Income: 18750/- per month

व्यवसाय करणे आता झाले सोपे!

ज्यांना जीवनाला काही उद्देश आहे अश्यानी या ग्रुप मध्ये आजच सहभागी व्हावे आणि आर्थिक सक्षमतेकडे आमच्या सोबत वाटचाल करावी।

#bharatcanteen

Friday, June 25, 2021

Business Facts

#उद्योजक_मित्र
व्यवसाय करायचा असेल तर काम करावंच लागतं... घरबसल्या काहीच होऊ शकत नाही.

कित्येक कॉल येतात, व्यवसायाची माहिती घेतात, वेळ फुकट असल्यासारखं कितीतरी वेळ बोलत बसतात, कितीतरी प्रश्न विचारून माहिती घेतात, आणि शेवटी एक प्रश्न विचारतात...  ग्राहक आम्ही शोधायचे कि तुम्ही देणार? अरे.. हा प्रश्न पडतोच कसा? ग्राहक तुम्ही नाही शोधायचे मग कोण शोधणार? जो ग्राहक देऊ शकतो तो ग्राहकांना प्रोडक्ट/सर्व्हिस सुद्धा देऊ शकतो ना? तुमची काय गरज आहे मग? दुसऱ्याने ग्राहक शोधून तुम्हाला का द्यायचे? आणि ग्राहकच शोधायचे नसतील तर व्यवसायात राहिलंच काय? नोकरी मागताना मालकाला 'काम मी करायचे कि तुम्ही करणार' असे म्हणता का? नाही ना? मग व्यवसायात 'ग्राहक मी शोधायचे कि तुम्ही देणार' असा प्रश्न कसा विचारू शकता?  ग्राहकच तर मुख्य भाग आहे व्यवसायाचा, त्याच्यामुळेच तर पैसा मिळतो. तेच शोधायचे नसेल तर बाकीच्या हमाली कामाला व्यवसाय म्हणत नसतात... ग्राहक शोधावाच लागतो, तेच मुख्य काम असतं... ग्राहक शोधण्याचा कंटाळा असेल तर व्यवसायात तरी कशाला उतरायचं?

लोकांना प्रचंड पैसा कमवायचा आहे पण त्या प्रमाणात १% सुद्धा काम करण्याची तयारी नाहीये. काहीच त्रास नकोय, बसल्या बसल्या काही देऊ शकता का सांगा... बोलण्याचा आवेश असा असतो कि जणू व्यवसाय करून आपल्यावर आणि समाजावर उपकारच करत आहेत... तुम्ही व्यवसाय केला किंवा नाही केला कुणाला काय फरक पडतोय? आपल्यावाचून जगाचं काहीच अडलेलं नाहीये. जे काय करायचंय ते आपण आपल्यासाठी करतो आहोत, इतरांसाठी नाही. त्यामुळे काम करावाच लागतं, ते इतर कुणी करू शकत नाही.

काही दिवसांपूर्वी असाच एकाच कॉल आला होता, माझा एक मार्केटिंग विक्री विषयक लेख वाचून त्याने कॉल केला होता. बोलण्याची सुरुवातच रागीट  शब्दोच्चारांनी झाली होती. म्हणे मी एका कंपनीत महिनाभरापासून आहे, सेल्स साठी काम करतोय, पण मला ग्राहकच मिळत नाहीयेत. म्हटलं, ते ठीक आहे पण माझ्यावर का चिडतोय? म्हणे तुम्ही मार्केटिंग बद्दल लिहिताय मग ग्राहक का मिळत नाहीयेत सांगा.. म्हटलं असं पाच मिनिटात नाही सांगता येत. मग म्हणे आत्तापर्यंत ३०-४० दुकानदारांना भेटलो, ५-७ दुकानदारांनी प्रोडक्ट घेतले. बाकीचे फक्त उद्या ये, परवा ये असे करतात... म्हटलं मग जा कि दोन दिवसांनी... म्हणे का जाऊ? किती संधी द्यायची त्यांना? एकदा काय ते सांगत का नाही? म्हटलं भाऊ, तू त्यांना संधी देत नाही, ते तुला संधी देत आहेत... तुला त्यांच्या कलेप्रमाणे वागावे लागेल, त्यांचं तुझ्यावाचून काहीच अडलेल नाहीये... तू त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर उपकार करत नाहीये, ते तुझे प्रोडक्ट घेऊन तुझ्यावर उपकार करत आहेत.

असाच काही दिवसांपूर्वी एकाच कॉल आलेला होता, त्याला कन्सल्टेशन हवं होतं. बोलता बोलता असं लक्षात आलं कि त्या व्यक्तीला मार्केटमध्ये उतरण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्याने दोन चार पोरांना कामावर ठेऊन यांच्याच भरवश्यावर व्यवसाय सोडून दिला होता. स्वतः ना काही लीड करत होता, ना आपल्या सेल्स टीम ला काही मार्गदर्शन करत होता, कारण त्यालाच विक्रीचा कसला अनुभव नव्हता... तो फक्त ऑफिस मध्ये बसून राहायचा आणि कामावर ठेवलेल्या मुलांना दररोजचे लेक्चर द्यायचा... आणि सगळी मुले सुद्धा शून्य अनुभवाची... त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तो मार्केटिंग चा विषय सरळ बाजूला करून विषय बदलायचा.. पण त्याला व्यवसाय मात्र खूप यशस्वी करायचा होता. माझी हजारो रुपये फी द्यायला तयार होता, पण घेऊन काय फायदा? त्याला स्वतःला कामच करायचं नाहीये, मी मार्गदर्शन कुणाला करू? अशाने व्यवसाय कसा चालणार आहे?

आपण 'काय करतोय' आणि 'का करतोय' या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असलीच पाहिजेत... काम तर करावंच लागतं, आणि मार्केटमध्ये उतरवत लागतं.. ग्राहक शोधावेच लागतात. ग्राहक शोधण्याचा, विक्रीचा, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा कंटाळा असेल तर व्यवसायात उतरूच नका, त्यापेक्षा ते व्यवसायाला लागणारे पैसे FD करून ठेवा, किमान वाया तरी जाणार नाहीत...

रिस्क फ्री व्यवसाय करायचा असेप तर नक्की संपर्क करावा..
संपूर्ण महाराष्ट्र
आजच कॉल करावा : Group Pramoter

Monday, April 27, 2020

सुरू करा शून्य गुंतवणुकीत एक व्यवसाय


चीन कोरोना आणि भारताच्या संधी

सध्या चीन मुळे देशात कोरोनाची अराजकता माजली म्हणून आम्ही चिनी उत्पादन वापरणार नाही, टाटा कंपनीने हे बनवावं आणि ते बनवावं हे सुरू झालं.
खरं तर खूप छान वाटतंय की आपली लोकं आता स्वदेशीचा आग्रह धरायला सुरवात होत्ये हे पाहून. पण एक प्रश्न मला राहवत नाही म्हणून सर्वाना विचारतोय. अर्थात मी स्वतःला सुध्दा विचारत आहेच.
एवढी वर्ष आपण सकाळच्या टूथपेस्ट पासून रात्री गुड नाईट पर्यंत बहुतांशी वस्तू दुसऱ्या देशाच्या वापरतोय हे कधीच लक्षात नाही आलं का आपल्या?
कोलगेट, पेपसोडेंट, क्लोजअप पासून सुरवात करू म्हंटल तर किमान ९८% वस्तू आपण मोठ्या ब्रँड च्या नावाखाली ह्या विदेशी वापरतो. त्यातून आपल्या देशातून रोज कैक हजार करोड नव्हे कैक लाख करोड रुपयांचा दुसऱ्या देशाला फायदा करून देतो. याने नक्की काय होत असेल?
रुपयाचं अवमूल्यांकन. गेली कित्येक वर्षे आपण हेच करत आलोय आणि दोष देतो ते सरकारला. मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजप किंवा खिचडी.
आत्ताच चीन ने आपल्या देशात आर्थिक गुंतवणूक चालू केली. ठाण्याची एक नामवंत(नितीन कंपनी) देखील खरेदी केली. देशातल्या औषध बनवणाऱ्या कंपनी मध्ये गुंतवणूक देखील चालू केली. आणखी कुठे सुरवात केली असेल माहीत नाही. पण याचा अर्थ काय? आता चीन आपल्या देशात स्वतःचे जाळे पसरवू पाहत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात जमीन, सोयी-सुविधा, कच्चा माल, वीज, पैसा आणि अगदी कामगार सुद्दा आपले आणि नफा मात्र चीनचा.

आता मला सांगा कोरोना मुले आज ही परिस्थिती आपल्यावर ओढावली असतांना देखील आपल्याला हेच भोगावे लागणार ते सुद्धा त्याच देशामुळे हे तुम्हाला पटतंय का?

येऊया परत टाटा समूहाच्या मुद्यावर.

मला सांगा सगळं त्यांनी करायचं तर आपण काय करायचं? आपली नैतीक, सामाजिक, राष्ट्रीय काहीच जबाबदारी नाही का?
आपल्या आजूबाजूला छोट्या मोठ्या कितीतरी कंपनी असतात जे मोठ्या कंपनी सारखं वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवत असतात. त्यांच्या मालाला खप नाही म्हणून शेवटी त्या कँपनी बंद पडतात. पण आपण त्या कंपनीचा ब्रँड मोठा नाही म्हणून त्या वस्तू घेत नाही. आपला दुसरा समज त्या वस्तूंचा दर्जा नाही. पण आपण हे फक्त त्याचं पॅकिंग पाहूनच ठरवत असतो असं मला वाटतं. कारण जर ते उत्पादन वापरलं तर समजलं असतं की आपण आधीच मत करून घेतलं होतं ते चुकीचं होतं.
पण मला सांगा आपण असंच आणखी किती वर्ष चालू ठेवणार? उद्या आपल्या उत्पादनाच्या बाबतीत पण जर असंच ऐकायला लागलं ते सुद्धा न वापरता तर? आणि आज नाही तर उद्या हे होणारच की. जे आपण देतो तेच आपल्याला मिळत असतं.
मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने मला काही वस्तू वापरून पहा असं म्हंटल. अर्थात ते MLM चे प्रोडक्ट होते. पण रोजच्या गरजेच्या वस्तू होत्या. मी रीतसर त्या वस्तू घेतल्या त्यातल्या काही वस्तू मला हव्या असलेल्या दर्जाच्या होत्या काही वास्तूंबद्दल मला सांगता येणार नाही कारण त्या स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या असल्या कारणाने माझा फार असा अनुभव नव्हता. पण माझ्या आईला त्या वस्तू आवडल्या. मग मी ठरवलं की काही वस्तू तरी आपण बदलू शकतो आणि देशाच्या पैशाला बाहेर जाण्यापासून वाचवू शकलो तरी माझ्या वतीने तेव्हडे तरी होईल.
त्या वस्तू आपण सुद्धा देशी कंपनीच्या घेऊ शकता की. मी त्या MLM मधून घ्या असं नाही म्हणत पण किमान आपल्या लोकांकडून घेतल्या तर किमान देशातल्या पैशाची बाहेरची वाट दाखवणं आपण थोडं तरी कमी करू. त्याने आपल्या इथल्या कंपनीच्या वस्तूंची मागणी वाढेल, आपल्या लोकांनां रोजगार मिळेल, देशातल्या कच्या मालाची मागणी वाढेल. पर्यायाने हळु हळू चित्र बदलायला सुरवात तर होईल.
आणि मी एकटा करून काय होणार? हा विचार काढून किमान मी तरी सुरवात करतो म्हणून जर सुरवात केली तर कदाचित आणखी लोकं आपल्या बरोबर येतील की.

देशातील प्रत्येक क्रांतिकारक असंच म्हणाले असते की मी एकटा काय करणार तर आज देश स्वतंत्र झाला असता का?

विचार करा. अजून वेळ गेली नाही.

शर्यत अजून संपलेली नाही कारण आपला देश अजून जिंकलेला नाही. आपल्या देशाला जिंकवायचं की हरवायचं हे आपल्या हातात आहे. आणि मला नक्की खात्री आहे की आपण सगळे जर स्वदेशी वस्तू थोड्या महाग, थोड्याश्या कमी दर्जाच्या असल्या तरी वापरून त्यांना उत्पादन वाढवायला आणि दर्जा सुधारायला संधी देण्याचा एकदा तरी प्रयत्न तरी करून पाहु.
वंदे मातरम.

लेखक - प्रशांत म. सहस्त्रबुद्धे.
मूळ - सोशल मीडिया

एक सुंदर लेख - सोशल मीडिया वरून थेट आपल्या साठी😊🙏🏻

स्वतः भारतीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या किव्हा सहयोग देऊ इच्छिणाऱ्या सुजाण व्यक्तींनी पुढील फॉर्म भरावा व सहकार्य करावे।

https://forms.gle/emVNLL2LfgxiGEXZA

STAR YOUTH INDIA GROUP

धन्यवाद😊🙏🏻

Wednesday, April 22, 2020

१००००० लोकांचा व्यावसायिक SYI Group

STAR YOUTH Society of INDIA
REG NO 17/2004-MAHARASHTRA
AMRAVATI DESTRICT

१००००० व्यावसायिक लोकांचा SYI Group

देशातील प्रत्तेक युवक हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हाच मुख्य उद्देश ।
या गटात बळकटी देण्यासाठी आमची 14 वर्षाची मेहनत आहे।
तरी जो या संकल्पनेत शेवट पर्यन्त साथ देईल,नक्कीच तो ग्रुप मधे व् समाजा मधे नाव करेल हे सत्य।
व्यक्ती ह्या वयोमानानुसार मरण पावतात पण आपल्या नावाचा ठसा उमटवून अजरामर होतात।
( SYI ग्रुप- व्यवसाय मार्फत रोजगार व स्वतःचा विकास)
गटामध्ये सामील होणारा प्रत्येक युवा हा या विचारधारेला एकनिष्ठ असला पाहिजे व संघटनेने ठरविलेले नियम पाळून संघटनेचे समाजाप्रती असलेल्या उद्देशपुर्तीकारिता तो लढायला पाहिजे।
स्वतः आर्थिक संपन्न व स्वावलंबी बनणे हा सर्व प्रथम आपला उद्धेश्य आहे.
"युवांचा विकास, शैक्षणिक व आर्थिक प्रगती करणे व सामाजिक सहभाग वाढविणे... या प्रमुख मुद्द्यांवर प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध व नियोजनाने कार्य करणे आणि सामाजिक गोष्टींचे सत्य स्वीकारून युवकांना-युवतींना योग्य व वास्तविक मार्गदर्शन करणे, अशी विचारधारा आपल्या रुज्वायची आहे...!!

या विचारधारेला जुळणा-या विचारांच्या युवकांची आज देशाला खुप गरज आहे व म्हणुनच युवकांना विकासाच्या दिशेने घेवुन जायचे काम आपण योग्यरितीने पार पाडू शकतो, असा माझा ठाम विश्वास आहे...

आजवर आपण समाजाच्या नावाच्या संघटना बनवत आलो... का तर समाजाची आणि जातीची सेवा करायची परंतु सर्व समावेशक समाजाची सेवा हिच खरी ईश्वर सेवा म्हणुन समाज परिवर्तन/समाज कार्य ह्या दोन भिन्न बाबी आहेत, हे आधी लक्षात घ्यावे लागेल. “गरजवंताला एक वेळेची सोय करणे म्हणजे समाज सेवा...!!”

आणि “गरजूला मागण्याची वेळच येवू नये तो स्वावलंबी व्हावा... म्हणजेच विचार परिवर्तन/समाज कार्य..!!”
आणि आपल्या
संघटना तयार होत आहे.

आपण संघटीत कशासाठी झालो आहोत याची माहिती युवकांना कार्यकर्त्याला माहिती असणे गरजेचे असते. यामुळे युवकांना जर संघटनेची विचारप्रणाली समजावून सांगितली आणि जर का त्याला ती मनापासून आवडली, पटली तर ते संघटन मजबूत होते म्हणजेच ते विचाराने एकत्र आलेले असतात अशा कार्यकर्त्यांना कोणत्याही लोभाची प्रसिद्धीची हाव नसते व हे कार्यकर्ते संघटनेशी एकनिष्ठ असतात.
युवक-युवतींच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाकरिता उपयोगी ठरेल एवढेच विषय आपण या गटाच्या च्या माध्यमातून युवावर्गा समोर मांडणार आहोत व त्याच मुद्द्यांना धरून हे कार्य करणार आहोत.  प्रत्येक हाताला काम प्रत्तेक महिलेला सन्मानाने रोजगार साधन उपलब्ध करून देणे व एकूण सामाजिक व आर्थिक विकास हे आपले सर्वांचे ध्येय असायला हवे. आपले मुख्य विषय व उद्दिष्ठे हे खालील प्रमाणे असतील.

👉१. बेरोजगारीवर उपाय शोधून कृतीतून जास्तीज जास्त रोजगार संधी निर्माण करणे. युवकांच्या मनात भविष्याबद्दल सकारात्मकता निर्माण करणे.
👉२. शैक्षणिक, व्यवसायिक, Career, आरोग्यविषयक मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणे.
👉३. युवक-युवतींना शैक्षणिक , औद्योगिक, सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती व युवा एकीकरण अभियान राबविणे.
👉४. सहकार्य व सहभाग या तत्वावर शिक्षित युवावर्गाच्या विकासाच्या योजना राबविणे.
👉५. समाजामध्ये मुख्यत: व्यसनमुक्ती तसेच समाजातील अनिष्ठ्प्रथा व अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अभियान राबविणे.
👉 ६. महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविणे उदा. महिला बचत गट स्थापन करण्यास सहकार्य करणे व प्रोस्ताहन देणे, विविध लघुउद्योग स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे.
👉७. समाजातील व्यवसायिकांचे आणि विविध छंद जोपासणा-यां कारागिरांचे त्यांच्या विविध उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन भरविणे.
👉८. विषमुक्त शेती ला प्राधान्य देणे व घरगुती परसबाग लावण्याचे उपक्रम राबविणे.
👉९. लहान मुलां - मुलीं साठी मोफत संगीत, गायन, वादन, नृत्य व इतर अशा कलेंचा विकास होण्याकरिता विशेष समिती स्थापन करून विविध दीर्घकालीन शिबिरे आयोजित करणे.
👉१०.अंध , अपंग , व मूक-बधिर युवांसाठी समिती स्थापन करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
👉११. ग्रुप चे संघटन व वैचारिक स्थिती सुधारण्यासाठी सदैव प्रयत्न करणे. व्यक्तिमत्व विकास करणे.
👉१२. वृक्षारोपण, भ्रष्टाचारमुक्त भारत, स्वच्छ भारत अभियान राबविणे व तसेच राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करणे.

सर्वात महत्वाचे सदस्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविने।

गटात सामील होण्यासाठी आजच संपर्क करा: संपूर्ण महाराष्ट्र

MAHENDRA N. KACHAWE 9284067607
BHUSHAN K. DHUVE 8999932682

WE WILL DO TOGETHER

Monday, March 30, 2020

घरीच थांबा, कोरोना ला हरवा

२०२०गरुड हा सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते. मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो पण ती अशक्त होत असतात. त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणे किंवा सर्व पिसे एकदम उपटून काढणे.
स्वतःची पिसे उपटून काढणे हे खूप वेदनादायी काम असते. परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर, जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो, एखाद्या योगी असल्यासारखा
आपल्या अणकुचीदार चोचीने तो स्वतःची पिसे उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे उपटून काढतो.

सगळी पिसे उपटल्यावर विद्रुप, जखमांनी जर्जर दिसत असतो. पण काही दिवसांतच त्याला नवीन  पिसे येऊ लागतात. आणि तब्बल १५० दिवसांचा हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल तीस वर्षांनी वाढलेले आयुष्य जगण्यासाठी तो सिद्ध होतो.

ह्या नवीन पंखांसह घेतल्या जाणाऱ्या भरारीला ''गरुडाचा पुनर्जन्म'' असे म्हटले जाते.

आज आपला देशही अशाच अवस्थेत आहे.  २१ दिवसांचा काळ वेदना देणारा आहे. पण ह्या वेदना सहन करून आपला देश पुन्हा गरूडभरारी घेईल ह्यात काही शंका नाही. 🦇

🙏 तेंव्हा कृपा करून घरातच थांबा आणि आपण व आपले संपूर्ण परीवार  सुरक्षित ठेवा:

-२०२० आपले आहे..