Monday, March 30, 2020

घरीच थांबा, कोरोना ला हरवा

२०२०गरुड हा सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते. मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो पण ती अशक्त होत असतात. त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणे किंवा सर्व पिसे एकदम उपटून काढणे.
स्वतःची पिसे उपटून काढणे हे खूप वेदनादायी काम असते. परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर, जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो, एखाद्या योगी असल्यासारखा
आपल्या अणकुचीदार चोचीने तो स्वतःची पिसे उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे उपटून काढतो.

सगळी पिसे उपटल्यावर विद्रुप, जखमांनी जर्जर दिसत असतो. पण काही दिवसांतच त्याला नवीन  पिसे येऊ लागतात. आणि तब्बल १५० दिवसांचा हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल तीस वर्षांनी वाढलेले आयुष्य जगण्यासाठी तो सिद्ध होतो.

ह्या नवीन पंखांसह घेतल्या जाणाऱ्या भरारीला ''गरुडाचा पुनर्जन्म'' असे म्हटले जाते.

आज आपला देशही अशाच अवस्थेत आहे.  २१ दिवसांचा काळ वेदना देणारा आहे. पण ह्या वेदना सहन करून आपला देश पुन्हा गरूडभरारी घेईल ह्यात काही शंका नाही. 🦇

🙏 तेंव्हा कृपा करून घरातच थांबा आणि आपण व आपले संपूर्ण परीवार  सुरक्षित ठेवा:

-२०२० आपले आहे..

समाजसेवा

*सेवा है यह यज्ञकुंड, समिधा सम हम जले*

तळहाताच्या मजुरीवर पोट असणाऱ्या बांधवाना सामाजिक कार्यकर्ते श्री संजयभाऊ पनपालिया यांच्या कडून मिळाला आधार
एक सामाजिक पाऊल

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथील सामाजिक कार्यकर्ते *श्री संजयभाऊ पनपालिया* यांनी आपल्या देशावर आलेले कोरोना विषयक संकट पाहून व त्यातच गावातील तळ हातावर पोट असणाऱ्या जनतेचे दोन वेळच्या जेवणाची काळजी पाहून आपल्या शेतात असलेला सर्व भाजीपाला गावातील जनतेला मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा पासून संचारबंदी आहे त्यापासून लोकांना त्यांच्या परिवाराला कोणताही मोबदला न घेता आपल्या शेतातील वांगे, पालक, टमाटर, मिरच्या मोफत दिले। श्री संजयभाऊ पनपालिया यांनी आपला शेतातील भाजीपाला व्यापाऱ्याला न देता थेट दाभाडा येथील झोपडपट्टी राहुटी असणाऱ्या व गावातील गरजू बांधवाना दिला व एक आपुलकी च्या नात्याने या संकटात मदद केली। संजयभाऊ नेहमी अश्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। माननीय मोदीजी नि आवाहन केल्याप्रमाणे त्यांचे कार्य सुरू आहे आणि कोरोना चा प्रतिबंध व्हावा या साठी ते स्वतः गाडीने भाजीपाला पोहचवत आहे आणि गर्दी न होता लोकांना मदद करण्याचा कोणतीही अवास्तव प्रसिद्धी न करता सेवा करत आहेत। त्यांच्या या सामाजिक कार्या मुळे गावातील मजूर लोकांना एक आधार मिळाला असून प्रसिद्धी नाही परंतु जे श्रीमंत आपल्या कडून शक्य ते मदद देऊ शकतील त्यांनी मदद करावी।
- संकलन व लेखन
महेंद्र नानाजी कचवे
Whatsapp वरील पत्रकार
(रा. दाभाडा, ता धामणगाव रेल्वे)*