*सेवा है यह यज्ञकुंड, समिधा सम हम जले*
तळहाताच्या मजुरीवर पोट असणाऱ्या बांधवाना सामाजिक कार्यकर्ते श्री संजयभाऊ पनपालिया यांच्या कडून मिळाला आधार
एक सामाजिक पाऊल
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथील सामाजिक कार्यकर्ते *श्री संजयभाऊ पनपालिया* यांनी आपल्या देशावर आलेले कोरोना विषयक संकट पाहून व त्यातच गावातील तळ हातावर पोट असणाऱ्या जनतेचे दोन वेळच्या जेवणाची काळजी पाहून आपल्या शेतात असलेला सर्व भाजीपाला गावातील जनतेला मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा पासून संचारबंदी आहे त्यापासून लोकांना त्यांच्या परिवाराला कोणताही मोबदला न घेता आपल्या शेतातील वांगे, पालक, टमाटर, मिरच्या मोफत दिले। श्री संजयभाऊ पनपालिया यांनी आपला शेतातील भाजीपाला व्यापाऱ्याला न देता थेट दाभाडा येथील झोपडपट्टी राहुटी असणाऱ्या व गावातील गरजू बांधवाना दिला व एक आपुलकी च्या नात्याने या संकटात मदद केली। संजयभाऊ नेहमी अश्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। माननीय मोदीजी नि आवाहन केल्याप्रमाणे त्यांचे कार्य सुरू आहे आणि कोरोना चा प्रतिबंध व्हावा या साठी ते स्वतः गाडीने भाजीपाला पोहचवत आहे आणि गर्दी न होता लोकांना मदद करण्याचा कोणतीही अवास्तव प्रसिद्धी न करता सेवा करत आहेत। त्यांच्या या सामाजिक कार्या मुळे गावातील मजूर लोकांना एक आधार मिळाला असून प्रसिद्धी नाही परंतु जे श्रीमंत आपल्या कडून शक्य ते मदद देऊ शकतील त्यांनी मदद करावी।
- संकलन व लेखन
महेंद्र नानाजी कचवे
Whatsapp वरील पत्रकार
(रा. दाभाडा, ता धामणगाव रेल्वे)*
No comments:
Post a Comment