२०२०गरुड हा सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते. मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो पण ती अशक्त होत असतात. त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणे किंवा सर्व पिसे एकदम उपटून काढणे.
स्वतःची पिसे उपटून काढणे हे खूप वेदनादायी काम असते. परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर, जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो, एखाद्या योगी असल्यासारखा
आपल्या अणकुचीदार चोचीने तो स्वतःची पिसे उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे उपटून काढतो.
सगळी पिसे उपटल्यावर विद्रुप, जखमांनी जर्जर दिसत असतो. पण काही दिवसांतच त्याला नवीन पिसे येऊ लागतात. आणि तब्बल १५० दिवसांचा हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल तीस वर्षांनी वाढलेले आयुष्य जगण्यासाठी तो सिद्ध होतो.
ह्या नवीन पंखांसह घेतल्या जाणाऱ्या भरारीला ''गरुडाचा पुनर्जन्म'' असे म्हटले जाते.
आज आपला देशही अशाच अवस्थेत आहे. २१ दिवसांचा काळ वेदना देणारा आहे. पण ह्या वेदना सहन करून आपला देश पुन्हा गरूडभरारी घेईल ह्यात काही शंका नाही. 🦇
🙏 तेंव्हा कृपा करून घरातच थांबा आणि आपण व आपले संपूर्ण परीवार सुरक्षित ठेवा:
-२०२० आपले आहे..
No comments:
Post a Comment