Monday, April 27, 2020

सुरू करा शून्य गुंतवणुकीत एक व्यवसाय


चीन कोरोना आणि भारताच्या संधी

सध्या चीन मुळे देशात कोरोनाची अराजकता माजली म्हणून आम्ही चिनी उत्पादन वापरणार नाही, टाटा कंपनीने हे बनवावं आणि ते बनवावं हे सुरू झालं.
खरं तर खूप छान वाटतंय की आपली लोकं आता स्वदेशीचा आग्रह धरायला सुरवात होत्ये हे पाहून. पण एक प्रश्न मला राहवत नाही म्हणून सर्वाना विचारतोय. अर्थात मी स्वतःला सुध्दा विचारत आहेच.
एवढी वर्ष आपण सकाळच्या टूथपेस्ट पासून रात्री गुड नाईट पर्यंत बहुतांशी वस्तू दुसऱ्या देशाच्या वापरतोय हे कधीच लक्षात नाही आलं का आपल्या?
कोलगेट, पेपसोडेंट, क्लोजअप पासून सुरवात करू म्हंटल तर किमान ९८% वस्तू आपण मोठ्या ब्रँड च्या नावाखाली ह्या विदेशी वापरतो. त्यातून आपल्या देशातून रोज कैक हजार करोड नव्हे कैक लाख करोड रुपयांचा दुसऱ्या देशाला फायदा करून देतो. याने नक्की काय होत असेल?
रुपयाचं अवमूल्यांकन. गेली कित्येक वर्षे आपण हेच करत आलोय आणि दोष देतो ते सरकारला. मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजप किंवा खिचडी.
आत्ताच चीन ने आपल्या देशात आर्थिक गुंतवणूक चालू केली. ठाण्याची एक नामवंत(नितीन कंपनी) देखील खरेदी केली. देशातल्या औषध बनवणाऱ्या कंपनी मध्ये गुंतवणूक देखील चालू केली. आणखी कुठे सुरवात केली असेल माहीत नाही. पण याचा अर्थ काय? आता चीन आपल्या देशात स्वतःचे जाळे पसरवू पाहत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात जमीन, सोयी-सुविधा, कच्चा माल, वीज, पैसा आणि अगदी कामगार सुद्दा आपले आणि नफा मात्र चीनचा.

आता मला सांगा कोरोना मुले आज ही परिस्थिती आपल्यावर ओढावली असतांना देखील आपल्याला हेच भोगावे लागणार ते सुद्धा त्याच देशामुळे हे तुम्हाला पटतंय का?

येऊया परत टाटा समूहाच्या मुद्यावर.

मला सांगा सगळं त्यांनी करायचं तर आपण काय करायचं? आपली नैतीक, सामाजिक, राष्ट्रीय काहीच जबाबदारी नाही का?
आपल्या आजूबाजूला छोट्या मोठ्या कितीतरी कंपनी असतात जे मोठ्या कंपनी सारखं वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवत असतात. त्यांच्या मालाला खप नाही म्हणून शेवटी त्या कँपनी बंद पडतात. पण आपण त्या कंपनीचा ब्रँड मोठा नाही म्हणून त्या वस्तू घेत नाही. आपला दुसरा समज त्या वस्तूंचा दर्जा नाही. पण आपण हे फक्त त्याचं पॅकिंग पाहूनच ठरवत असतो असं मला वाटतं. कारण जर ते उत्पादन वापरलं तर समजलं असतं की आपण आधीच मत करून घेतलं होतं ते चुकीचं होतं.
पण मला सांगा आपण असंच आणखी किती वर्ष चालू ठेवणार? उद्या आपल्या उत्पादनाच्या बाबतीत पण जर असंच ऐकायला लागलं ते सुद्धा न वापरता तर? आणि आज नाही तर उद्या हे होणारच की. जे आपण देतो तेच आपल्याला मिळत असतं.
मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने मला काही वस्तू वापरून पहा असं म्हंटल. अर्थात ते MLM चे प्रोडक्ट होते. पण रोजच्या गरजेच्या वस्तू होत्या. मी रीतसर त्या वस्तू घेतल्या त्यातल्या काही वस्तू मला हव्या असलेल्या दर्जाच्या होत्या काही वास्तूंबद्दल मला सांगता येणार नाही कारण त्या स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या असल्या कारणाने माझा फार असा अनुभव नव्हता. पण माझ्या आईला त्या वस्तू आवडल्या. मग मी ठरवलं की काही वस्तू तरी आपण बदलू शकतो आणि देशाच्या पैशाला बाहेर जाण्यापासून वाचवू शकलो तरी माझ्या वतीने तेव्हडे तरी होईल.
त्या वस्तू आपण सुद्धा देशी कंपनीच्या घेऊ शकता की. मी त्या MLM मधून घ्या असं नाही म्हणत पण किमान आपल्या लोकांकडून घेतल्या तर किमान देशातल्या पैशाची बाहेरची वाट दाखवणं आपण थोडं तरी कमी करू. त्याने आपल्या इथल्या कंपनीच्या वस्तूंची मागणी वाढेल, आपल्या लोकांनां रोजगार मिळेल, देशातल्या कच्या मालाची मागणी वाढेल. पर्यायाने हळु हळू चित्र बदलायला सुरवात तर होईल.
आणि मी एकटा करून काय होणार? हा विचार काढून किमान मी तरी सुरवात करतो म्हणून जर सुरवात केली तर कदाचित आणखी लोकं आपल्या बरोबर येतील की.

देशातील प्रत्येक क्रांतिकारक असंच म्हणाले असते की मी एकटा काय करणार तर आज देश स्वतंत्र झाला असता का?

विचार करा. अजून वेळ गेली नाही.

शर्यत अजून संपलेली नाही कारण आपला देश अजून जिंकलेला नाही. आपल्या देशाला जिंकवायचं की हरवायचं हे आपल्या हातात आहे. आणि मला नक्की खात्री आहे की आपण सगळे जर स्वदेशी वस्तू थोड्या महाग, थोड्याश्या कमी दर्जाच्या असल्या तरी वापरून त्यांना उत्पादन वाढवायला आणि दर्जा सुधारायला संधी देण्याचा एकदा तरी प्रयत्न तरी करून पाहु.
वंदे मातरम.

लेखक - प्रशांत म. सहस्त्रबुद्धे.
मूळ - सोशल मीडिया

एक सुंदर लेख - सोशल मीडिया वरून थेट आपल्या साठी😊🙏🏻

स्वतः भारतीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या किव्हा सहयोग देऊ इच्छिणाऱ्या सुजाण व्यक्तींनी पुढील फॉर्म भरावा व सहकार्य करावे।

https://forms.gle/emVNLL2LfgxiGEXZA

STAR YOUTH INDIA GROUP

धन्यवाद😊🙏🏻

No comments:

Post a Comment