Wednesday, December 11, 2019

Possibility and Development

Business Opportunities with Star Youth India Group- life for purpose!

Unlimited products agencies
Unlimited products & services
Unlimited Business ideas
Got online shopping business opportunity
One of the dynamic business opportunity
Buy or sell anything like Bharat Canteen Members
Got intensives on business
Long term goals
Join prime membership
& Starts earning from today
Again Life for purposes
_Star Youth India

Friday, March 29, 2019

Business 'नेटवर्क' SYI group

उद्योजकता विकास
‘नेटवर्क मार्केटिंग’ : दुसरी बाजू

मध्यंतरीच्या काळात मी आर्थिक गुंतवणूक आणि व्यावसायिक लेखन भरपूर केले होते. त्या वेळी काही जणांनी मला या विषयावर लेखन करायला सांगितले होते. ज्यांनी ज्यांनी सांगितले त्यांनी नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम केले होते आणि त्यांचा अनुभवसुद्धा होता. म्हणून माझा काय सल्ला राहील यासाठी त्यांनी हा विषय सुचवला. मी जिथे जिथे राहिलो, मग त्यात पुणे, मुंबई आणि कोल्हापूर आणि आजसुद्धा मला नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी व्याख्यान / मीटिंगला बोलावले जाते व मी अनेक वेळा उपस्थितसुद्धा राहिलो आहे. माझे काही जवळचे मित्रसुद्धा ह्या क्षेत्रात आघाडीवर काम करत आहेत. मला मार्केटिंग हा शब्द खूप आवडतो. म्हणून या विभागाचा थोडा अभ्यास केला. याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा अभ्यास सुरूच आहे. काही नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्यांचे विश्‍लेषणसुद्धा मी केले आहे. २०१० पासून मी या विषयात आहे. थेट विक्रीच्या
माध्यमातून अनेक जण कोट्यवधी रुपयेसुद्धा कमावलेले माझ्या माहितीतून आहेत, पण नेटवर्क मार्केटिंग हे क्षेत्र थोडेसे वेगळे आहे. MLM, डायरेक्ट सेलिंग, साखळी पद्धत, पिरॅमिड टाइप आणि अशी बरीच नावे आहेत. घरबसल्या व्यवसाय-बिझनेस करा आणि कमवा २५,००० महिना, डेली कॅश पेमेंट, नो सेलिंग अशा काही वर्तमानपत्रातल्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील किंवा आजचाच पेपर घ्या आणि छोट्या जाहिराती पाहा, तुम्हाला नक्की मिळेल अशी एक तरी जाहिरात. भारतीयांमध्ये या विषयासाठी नकारार्थीपणा जास्त आहे. त्याला कारणेसुद्धा तशीच आहेत. त्याचा वाईट आणि चुकीचा प्रचार केला गेला, कारण तशा अनेक कंपन्या आहेतही आणि मी त्यांच्या बर्‍याच व्याख्यानांना उपस्थित राहिलो आहे.

*या भागात आपण पाहू या की नेमके काय आहे नेटवर्क मार्केटिंग आणि त्याचा अर्थ / परिणाम.* अनेक लोकांना अजूनही माहिती नसेल, पण हा व्यवसाय (पुन्हा एकदा तो शब्द वाचा) किंवा हा प्रकार मुख्य प्रवाहात आलेला आहे. जगातील सर्वात मोठी डायरेक्ट सेलिंग कंपन्यांच्या यादी तुम्ही गुगलवर पाहा तुम्हाला विश्वास होणार नाही; पण रिटेल/होलसेल न करता ते आज अब्जावधी कमवत आहेत. अपलाइन, डाऊनलाइन व क्रॉसलाइनच्या लाइनमधून स्वत:चे विपणन कौशल्य वाढवताना व चेकचा फोटो काढून मित्रांना दाखवताना आर्थिक जीवनावर वरचढ करत लाखो लोक आज या क्षेत्रात जोडले गेलेले आहेत. खरे तर नेटवर्क मार्केटिंग सर्वच उत्पादनांमध्ये पसरली गेलेली ‘आधुनिक विक्रीची संकल्पना आहे’ जी नोकरी आणि उद्योजकतापेक्षा ‘पूर्ण’ वेगळी आहे. यामध्ये सांघिक परिश्रमाला खूप महत्त्व असते, जेणेकरून तुम्हाला तुमचा उजवा-डावा नियोजित करता यावे. जलद श्रीमंत होण्याचा भाग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आहे हे चुकीचे विधान असेल. लेख लिहिण्याआधी एक दिवस मला फोन आला होता. एका लांबच्या मित्राचा तो फोन होता, तो : आकाश, कसं चालू आहे तुझं? मी : मस्त चालू आहे. तो : अरे, तुला या रविवारी मिळेल का यायला, (हॉटेलचे नाव त्याने सांगितले आणि १०० रुपये फी असेल म्हणून सांगितले होते, आज त्याचा मला या महिन्यात चौथा फोन होता. त्याला माहिती होते मी कृषी क्षेत्रात काम करतो म्हणून तो मला त्या मीटिंगला बोलवत होता). मी : अरे (त्याचे नाव घेऊन) तुमच्या त्या कंपनीचे नाव काय आहे? तो : त्याने नाव सांगितले व म्हणाला की, मी काय सांगू शकणार नाही माहिती जास्त. तू ये मीटिंगला तुला पूर्ण बिझनेस कळेल. आपल्याच संबंधित आहे आणि फायदापण भरपूर आहे. मी : ओके चालेल. मी तुला उद्या फोन करून कळवतो. हे बोलून मी फोन ठेवला. त्याने ज्या कंपनीचे नाव सांगितले होते त्या कंपनीची मीटिंग वर्षभराआधी पुणे स्वारगेटच्या एका प्रसिद्ध ठिकाणी होती आणि मी तिथे उपस्थित राहिलो होतो. वरील प्रकारावरून लक्षात येते की, बर्‍याच नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांमध्ये विपणनावर लक्ष दिले जात नाही. याचे मला आश्‍चर्य वाटते. जर जोडल्या गेलेल्या सदस्याला मार्केटिंग करता आले नाही तर त्याची डाऊनलाइनबरोबर क्षमता/कौशल्ये/मूल्ये कशी काय वाढणार?
फक्त 2 जोडा लाखो मिळतील हा प्रकार चुकीचा आहे. अशा गोष्टी लॉजिकल दृष्टीने आजच्या शिक्षित युवकांनी समजून घ्यावे मगच निर्णय घ्यावा।

म्हणून ज्या कंपन्या (स्टार युथ इंडिया ग्रुप) विपणन म्हणजे मार्केटिंग शिकवतात त्यात नफा तर होईलच त्याचबरोबर महत्त्वाची जीवनमूल्ये विकसित (विक्री कला ही जीवनाची महत्त्वाची कौशल्ये आहेत म्हणून मी त्याला जीवनमूल्ये म्हणतो.) होईल अशा कंपन्या शोधा फक्त मिटिंगला बोलवून बिझनेस शिका म्हणून काय होणार आहे? या माध्यमातून उत्पादक व वितरक यांमध्ये एकप्रकारे विश्वासू संबध तयार होत ज्याने वस्तूचा-उत्पादनाचा दर्जा उत्तमप्रकारे टिकून राहण्यची शक्यता जास्त असते. नेटवर्क मार्केटिंग एक वैयक्तिक फ्रँचायझी आहे असंसुद्धा म्हटलं जातं, पण हा नोकरीपेक्षा अनेक मूल्ये शिकवणारा भाग आहे उदा. स्वप्ने पाहणे, विपणन, संवाद कौशल्ये (महत्त्वाचं), आत्मविश्वास, धैर्य, ध्येय निश्‍चिती या आणि अशी बरीच जीवनमूल्ये जी आपल्याला अनेक वर्षाच्या अनुभवानंतर समजतात. जगातील अब्जावधी लोकांचा business नेटवर्क आहेच आणि असावा लागतोच हे हि तितकंच तथ्य आहे. माझ्या बर्‍याच लेखातून शिक्षणातून बोलत असतो पण मी असेही शिक्षण पाहिलं आहे जे गुंतवणुकीही शिकवतात ते ही ह्याच प्रकारातून. उत्पादन, विक्री, व्यवस्थापन, वास्तव जगातील ज्ञान शिकायचं असेल तर ते तुम्हाला तिथे(Star Youth india group) मिळू शकेल. तुम्हाला श्रीमंत व्ह्याच असेल तर नेटवर्क मार्केटिंग करा असं मी कधीही म्हणणार नाही. नेटवर्क मार्केटिंग जॉईन होणार्‍या फक्त जास्तीत जास्त २४ टक्के लोक श्रीमंत होतात ही आकडेवारी दर्शवते. या भागाच्या शेवटी मी सांगू इच्छितो की नेटवर्क मार्केटिंग हा पैसे मिळवण्यापेक्षा बरंच काही त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा मार्ग आहे. कमी पैशात जास्त माणसे जोडणे असो किंवा वरील मी जीवनमूल्ये दिलेली असो किंवा तिथून मिळणारे शिक्षण असो ही संकल्पना खरोखर अफलातून आहे. –

( सद्य महाराष्ट्रात Star Youth India Group या क्षेत्रातील होतकरू तरुणांना सोबत घेऊन अत्यंत जबाबदारीने काम करीत आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील व्यवसायबद्दल जवळीक साधून एक जबरदस्त नेटवर्क बनविले आहे. आपण देखील याची माहिती घेऊन आपल्या भागाचे प्रतिनिधी तयार करा। गावातील 0.1 % युवक पूर्ण गावाचे आधार स्तंभ बनून गावाची आर्थिक उन्नती साधू शकतात व स्वतः एक यशस्वी उद्योजक म्हणून नेतृत्व बनू शकता। स्वतःपासून सुरुवात करा।)

कॉन्टॅक्ट SYI group
We believing in possibilities