Monday, April 27, 2020

सुरू करा शून्य गुंतवणुकीत एक व्यवसाय


चीन कोरोना आणि भारताच्या संधी

सध्या चीन मुळे देशात कोरोनाची अराजकता माजली म्हणून आम्ही चिनी उत्पादन वापरणार नाही, टाटा कंपनीने हे बनवावं आणि ते बनवावं हे सुरू झालं.
खरं तर खूप छान वाटतंय की आपली लोकं आता स्वदेशीचा आग्रह धरायला सुरवात होत्ये हे पाहून. पण एक प्रश्न मला राहवत नाही म्हणून सर्वाना विचारतोय. अर्थात मी स्वतःला सुध्दा विचारत आहेच.
एवढी वर्ष आपण सकाळच्या टूथपेस्ट पासून रात्री गुड नाईट पर्यंत बहुतांशी वस्तू दुसऱ्या देशाच्या वापरतोय हे कधीच लक्षात नाही आलं का आपल्या?
कोलगेट, पेपसोडेंट, क्लोजअप पासून सुरवात करू म्हंटल तर किमान ९८% वस्तू आपण मोठ्या ब्रँड च्या नावाखाली ह्या विदेशी वापरतो. त्यातून आपल्या देशातून रोज कैक हजार करोड नव्हे कैक लाख करोड रुपयांचा दुसऱ्या देशाला फायदा करून देतो. याने नक्की काय होत असेल?
रुपयाचं अवमूल्यांकन. गेली कित्येक वर्षे आपण हेच करत आलोय आणि दोष देतो ते सरकारला. मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजप किंवा खिचडी.
आत्ताच चीन ने आपल्या देशात आर्थिक गुंतवणूक चालू केली. ठाण्याची एक नामवंत(नितीन कंपनी) देखील खरेदी केली. देशातल्या औषध बनवणाऱ्या कंपनी मध्ये गुंतवणूक देखील चालू केली. आणखी कुठे सुरवात केली असेल माहीत नाही. पण याचा अर्थ काय? आता चीन आपल्या देशात स्वतःचे जाळे पसरवू पाहत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात जमीन, सोयी-सुविधा, कच्चा माल, वीज, पैसा आणि अगदी कामगार सुद्दा आपले आणि नफा मात्र चीनचा.

आता मला सांगा कोरोना मुले आज ही परिस्थिती आपल्यावर ओढावली असतांना देखील आपल्याला हेच भोगावे लागणार ते सुद्धा त्याच देशामुळे हे तुम्हाला पटतंय का?

येऊया परत टाटा समूहाच्या मुद्यावर.

मला सांगा सगळं त्यांनी करायचं तर आपण काय करायचं? आपली नैतीक, सामाजिक, राष्ट्रीय काहीच जबाबदारी नाही का?
आपल्या आजूबाजूला छोट्या मोठ्या कितीतरी कंपनी असतात जे मोठ्या कंपनी सारखं वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवत असतात. त्यांच्या मालाला खप नाही म्हणून शेवटी त्या कँपनी बंद पडतात. पण आपण त्या कंपनीचा ब्रँड मोठा नाही म्हणून त्या वस्तू घेत नाही. आपला दुसरा समज त्या वस्तूंचा दर्जा नाही. पण आपण हे फक्त त्याचं पॅकिंग पाहूनच ठरवत असतो असं मला वाटतं. कारण जर ते उत्पादन वापरलं तर समजलं असतं की आपण आधीच मत करून घेतलं होतं ते चुकीचं होतं.
पण मला सांगा आपण असंच आणखी किती वर्ष चालू ठेवणार? उद्या आपल्या उत्पादनाच्या बाबतीत पण जर असंच ऐकायला लागलं ते सुद्धा न वापरता तर? आणि आज नाही तर उद्या हे होणारच की. जे आपण देतो तेच आपल्याला मिळत असतं.
मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने मला काही वस्तू वापरून पहा असं म्हंटल. अर्थात ते MLM चे प्रोडक्ट होते. पण रोजच्या गरजेच्या वस्तू होत्या. मी रीतसर त्या वस्तू घेतल्या त्यातल्या काही वस्तू मला हव्या असलेल्या दर्जाच्या होत्या काही वास्तूंबद्दल मला सांगता येणार नाही कारण त्या स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या असल्या कारणाने माझा फार असा अनुभव नव्हता. पण माझ्या आईला त्या वस्तू आवडल्या. मग मी ठरवलं की काही वस्तू तरी आपण बदलू शकतो आणि देशाच्या पैशाला बाहेर जाण्यापासून वाचवू शकलो तरी माझ्या वतीने तेव्हडे तरी होईल.
त्या वस्तू आपण सुद्धा देशी कंपनीच्या घेऊ शकता की. मी त्या MLM मधून घ्या असं नाही म्हणत पण किमान आपल्या लोकांकडून घेतल्या तर किमान देशातल्या पैशाची बाहेरची वाट दाखवणं आपण थोडं तरी कमी करू. त्याने आपल्या इथल्या कंपनीच्या वस्तूंची मागणी वाढेल, आपल्या लोकांनां रोजगार मिळेल, देशातल्या कच्या मालाची मागणी वाढेल. पर्यायाने हळु हळू चित्र बदलायला सुरवात तर होईल.
आणि मी एकटा करून काय होणार? हा विचार काढून किमान मी तरी सुरवात करतो म्हणून जर सुरवात केली तर कदाचित आणखी लोकं आपल्या बरोबर येतील की.

देशातील प्रत्येक क्रांतिकारक असंच म्हणाले असते की मी एकटा काय करणार तर आज देश स्वतंत्र झाला असता का?

विचार करा. अजून वेळ गेली नाही.

शर्यत अजून संपलेली नाही कारण आपला देश अजून जिंकलेला नाही. आपल्या देशाला जिंकवायचं की हरवायचं हे आपल्या हातात आहे. आणि मला नक्की खात्री आहे की आपण सगळे जर स्वदेशी वस्तू थोड्या महाग, थोड्याश्या कमी दर्जाच्या असल्या तरी वापरून त्यांना उत्पादन वाढवायला आणि दर्जा सुधारायला संधी देण्याचा एकदा तरी प्रयत्न तरी करून पाहु.
वंदे मातरम.

लेखक - प्रशांत म. सहस्त्रबुद्धे.
मूळ - सोशल मीडिया

एक सुंदर लेख - सोशल मीडिया वरून थेट आपल्या साठी😊🙏🏻

स्वतः भारतीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या किव्हा सहयोग देऊ इच्छिणाऱ्या सुजाण व्यक्तींनी पुढील फॉर्म भरावा व सहकार्य करावे।

https://forms.gle/emVNLL2LfgxiGEXZA

STAR YOUTH INDIA GROUP

धन्यवाद😊🙏🏻

Wednesday, April 22, 2020

१००००० लोकांचा व्यावसायिक SYI Group

STAR YOUTH Society of INDIA
REG NO 17/2004-MAHARASHTRA
AMRAVATI DESTRICT

१००००० व्यावसायिक लोकांचा SYI Group

देशातील प्रत्तेक युवक हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हाच मुख्य उद्देश ।
या गटात बळकटी देण्यासाठी आमची 14 वर्षाची मेहनत आहे।
तरी जो या संकल्पनेत शेवट पर्यन्त साथ देईल,नक्कीच तो ग्रुप मधे व् समाजा मधे नाव करेल हे सत्य।
व्यक्ती ह्या वयोमानानुसार मरण पावतात पण आपल्या नावाचा ठसा उमटवून अजरामर होतात।
( SYI ग्रुप- व्यवसाय मार्फत रोजगार व स्वतःचा विकास)
गटामध्ये सामील होणारा प्रत्येक युवा हा या विचारधारेला एकनिष्ठ असला पाहिजे व संघटनेने ठरविलेले नियम पाळून संघटनेचे समाजाप्रती असलेल्या उद्देशपुर्तीकारिता तो लढायला पाहिजे।
स्वतः आर्थिक संपन्न व स्वावलंबी बनणे हा सर्व प्रथम आपला उद्धेश्य आहे.
"युवांचा विकास, शैक्षणिक व आर्थिक प्रगती करणे व सामाजिक सहभाग वाढविणे... या प्रमुख मुद्द्यांवर प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध व नियोजनाने कार्य करणे आणि सामाजिक गोष्टींचे सत्य स्वीकारून युवकांना-युवतींना योग्य व वास्तविक मार्गदर्शन करणे, अशी विचारधारा आपल्या रुज्वायची आहे...!!

या विचारधारेला जुळणा-या विचारांच्या युवकांची आज देशाला खुप गरज आहे व म्हणुनच युवकांना विकासाच्या दिशेने घेवुन जायचे काम आपण योग्यरितीने पार पाडू शकतो, असा माझा ठाम विश्वास आहे...

आजवर आपण समाजाच्या नावाच्या संघटना बनवत आलो... का तर समाजाची आणि जातीची सेवा करायची परंतु सर्व समावेशक समाजाची सेवा हिच खरी ईश्वर सेवा म्हणुन समाज परिवर्तन/समाज कार्य ह्या दोन भिन्न बाबी आहेत, हे आधी लक्षात घ्यावे लागेल. “गरजवंताला एक वेळेची सोय करणे म्हणजे समाज सेवा...!!”

आणि “गरजूला मागण्याची वेळच येवू नये तो स्वावलंबी व्हावा... म्हणजेच विचार परिवर्तन/समाज कार्य..!!”
आणि आपल्या
संघटना तयार होत आहे.

आपण संघटीत कशासाठी झालो आहोत याची माहिती युवकांना कार्यकर्त्याला माहिती असणे गरजेचे असते. यामुळे युवकांना जर संघटनेची विचारप्रणाली समजावून सांगितली आणि जर का त्याला ती मनापासून आवडली, पटली तर ते संघटन मजबूत होते म्हणजेच ते विचाराने एकत्र आलेले असतात अशा कार्यकर्त्यांना कोणत्याही लोभाची प्रसिद्धीची हाव नसते व हे कार्यकर्ते संघटनेशी एकनिष्ठ असतात.
युवक-युवतींच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाकरिता उपयोगी ठरेल एवढेच विषय आपण या गटाच्या च्या माध्यमातून युवावर्गा समोर मांडणार आहोत व त्याच मुद्द्यांना धरून हे कार्य करणार आहोत.  प्रत्येक हाताला काम प्रत्तेक महिलेला सन्मानाने रोजगार साधन उपलब्ध करून देणे व एकूण सामाजिक व आर्थिक विकास हे आपले सर्वांचे ध्येय असायला हवे. आपले मुख्य विषय व उद्दिष्ठे हे खालील प्रमाणे असतील.

👉१. बेरोजगारीवर उपाय शोधून कृतीतून जास्तीज जास्त रोजगार संधी निर्माण करणे. युवकांच्या मनात भविष्याबद्दल सकारात्मकता निर्माण करणे.
👉२. शैक्षणिक, व्यवसायिक, Career, आरोग्यविषयक मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणे.
👉३. युवक-युवतींना शैक्षणिक , औद्योगिक, सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती व युवा एकीकरण अभियान राबविणे.
👉४. सहकार्य व सहभाग या तत्वावर शिक्षित युवावर्गाच्या विकासाच्या योजना राबविणे.
👉५. समाजामध्ये मुख्यत: व्यसनमुक्ती तसेच समाजातील अनिष्ठ्प्रथा व अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अभियान राबविणे.
👉 ६. महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविणे उदा. महिला बचत गट स्थापन करण्यास सहकार्य करणे व प्रोस्ताहन देणे, विविध लघुउद्योग स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे.
👉७. समाजातील व्यवसायिकांचे आणि विविध छंद जोपासणा-यां कारागिरांचे त्यांच्या विविध उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन भरविणे.
👉८. विषमुक्त शेती ला प्राधान्य देणे व घरगुती परसबाग लावण्याचे उपक्रम राबविणे.
👉९. लहान मुलां - मुलीं साठी मोफत संगीत, गायन, वादन, नृत्य व इतर अशा कलेंचा विकास होण्याकरिता विशेष समिती स्थापन करून विविध दीर्घकालीन शिबिरे आयोजित करणे.
👉१०.अंध , अपंग , व मूक-बधिर युवांसाठी समिती स्थापन करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
👉११. ग्रुप चे संघटन व वैचारिक स्थिती सुधारण्यासाठी सदैव प्रयत्न करणे. व्यक्तिमत्व विकास करणे.
👉१२. वृक्षारोपण, भ्रष्टाचारमुक्त भारत, स्वच्छ भारत अभियान राबविणे व तसेच राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करणे.

सर्वात महत्वाचे सदस्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविने।

गटात सामील होण्यासाठी आजच संपर्क करा: संपूर्ण महाराष्ट्र

MAHENDRA N. KACHAWE 9284067607
BHUSHAN K. DHUVE 8999932682

WE WILL DO TOGETHER

Monday, March 30, 2020

घरीच थांबा, कोरोना ला हरवा

२०२०गरुड हा सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते. मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो पण ती अशक्त होत असतात. त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणे किंवा सर्व पिसे एकदम उपटून काढणे.
स्वतःची पिसे उपटून काढणे हे खूप वेदनादायी काम असते. परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर, जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो, एखाद्या योगी असल्यासारखा
आपल्या अणकुचीदार चोचीने तो स्वतःची पिसे उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे उपटून काढतो.

सगळी पिसे उपटल्यावर विद्रुप, जखमांनी जर्जर दिसत असतो. पण काही दिवसांतच त्याला नवीन  पिसे येऊ लागतात. आणि तब्बल १५० दिवसांचा हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल तीस वर्षांनी वाढलेले आयुष्य जगण्यासाठी तो सिद्ध होतो.

ह्या नवीन पंखांसह घेतल्या जाणाऱ्या भरारीला ''गरुडाचा पुनर्जन्म'' असे म्हटले जाते.

आज आपला देशही अशाच अवस्थेत आहे.  २१ दिवसांचा काळ वेदना देणारा आहे. पण ह्या वेदना सहन करून आपला देश पुन्हा गरूडभरारी घेईल ह्यात काही शंका नाही. 🦇

🙏 तेंव्हा कृपा करून घरातच थांबा आणि आपण व आपले संपूर्ण परीवार  सुरक्षित ठेवा:

-२०२० आपले आहे..

समाजसेवा

*सेवा है यह यज्ञकुंड, समिधा सम हम जले*

तळहाताच्या मजुरीवर पोट असणाऱ्या बांधवाना सामाजिक कार्यकर्ते श्री संजयभाऊ पनपालिया यांच्या कडून मिळाला आधार
एक सामाजिक पाऊल

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथील सामाजिक कार्यकर्ते *श्री संजयभाऊ पनपालिया* यांनी आपल्या देशावर आलेले कोरोना विषयक संकट पाहून व त्यातच गावातील तळ हातावर पोट असणाऱ्या जनतेचे दोन वेळच्या जेवणाची काळजी पाहून आपल्या शेतात असलेला सर्व भाजीपाला गावातील जनतेला मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा पासून संचारबंदी आहे त्यापासून लोकांना त्यांच्या परिवाराला कोणताही मोबदला न घेता आपल्या शेतातील वांगे, पालक, टमाटर, मिरच्या मोफत दिले। श्री संजयभाऊ पनपालिया यांनी आपला शेतातील भाजीपाला व्यापाऱ्याला न देता थेट दाभाडा येथील झोपडपट्टी राहुटी असणाऱ्या व गावातील गरजू बांधवाना दिला व एक आपुलकी च्या नात्याने या संकटात मदद केली। संजयभाऊ नेहमी अश्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। माननीय मोदीजी नि आवाहन केल्याप्रमाणे त्यांचे कार्य सुरू आहे आणि कोरोना चा प्रतिबंध व्हावा या साठी ते स्वतः गाडीने भाजीपाला पोहचवत आहे आणि गर्दी न होता लोकांना मदद करण्याचा कोणतीही अवास्तव प्रसिद्धी न करता सेवा करत आहेत। त्यांच्या या सामाजिक कार्या मुळे गावातील मजूर लोकांना एक आधार मिळाला असून प्रसिद्धी नाही परंतु जे श्रीमंत आपल्या कडून शक्य ते मदद देऊ शकतील त्यांनी मदद करावी।
- संकलन व लेखन
महेंद्र नानाजी कचवे
Whatsapp वरील पत्रकार
(रा. दाभाडा, ता धामणगाव रेल्वे)*

Thursday, January 16, 2020

Our Happy Partner

I'm very happy to join with Star Youth India  business Group, is a business group for earning money to youth and also all ages. It's platform to serve Employment. I want to tell everyone that you also join this group and enjoy your life. ....Best of luck SYI.
_ Pranit kumar Pathade